१.पूर्वीच्या रेशनिंग कार्ड मधून नाव कमी केलेला तहसीलदार अन्नधान्य वितरण अधिकारी यांचा दाखला.
२. घर स्वतःचे असल्यास करारपत्र व लाईट बिल ,भाड्याने असल्यास घर मालकाचे संमतीपत्र व लाईट बिल.
३. तलाठी यांच्याकडून प्राप्त रहिवाशी उत्पन्नाचा दाखला.
४. मतदार यादीतील नाव असलेल्या पानाची झेरॉक्स.
५. प्रतिज्ञापत्र.
नाव कमी करणे व दुसऱ्या रेशन कार्डमध्ये समाविष्ट करणे.
१.जन्म , विवाह होऊन स्थलांतरित होणे ,स्वतंत्र वास्तव्य, काम नोकरीनिमित्त स्थलांतर होणे ,मृत्यू इत्यादी कारणांमुळे युनिट कमी किंवा अधिक होतात.
२.एका रेशन कार्ड मधील युनिट कमी करणे अथवा वाढवणे यासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा.
३.अर्ज भरून दिलेल्या माहितीच्या सत्यतेची जबाबदारी अर्जदाराची असते.
४. अर्धा च्या माहितीची तपासणी करुन खात्री करुन घेतली जाते. संशयास्पद माहितीची खात्री पटल्यास युनिट कमी किंवा अधिक करण्याचे काम केले जाते.
५.नोकरीनिमित्त असल्यास बदलीच्या आदेशाची झेरॉक्स प्रत.
६. मयत असल्यास मृत्यूचा दाखला.
७. विवाह झाला असल्यास लग्नपत्रिका/ विवाह नोंदणी दाखला.
८. पूर्वीच्या रेटींग कार्ड मधून नाव कमी केलेला तहसीलदार /अन्नधान्य वितरण अधिकारी याचा दाखला.
९. ठिकाण राहत असलेला पुरावा भाड्याने राहत असल्यास घर मालकाचे संमतीपत्र लाईट बिल/ फोन बिल इत्यादी.
दुबार दुय्यम प्रत रेशन कार्ड काढणे
रेशन कार्ड हरवल्यास ,चोरी गेल्यास ,गहाळ झाल्यास आपल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्यात अर्ज करून रेशन कार्ड हरवल्याचा दाखला जोडून रेशनिंग विभागाला अर्ज प्रतिज्ञापत्र देऊन पटवून दिल्यास दुबार दुय्यम प्रत रेशन कार्ड मिळते.
जुने कार्ड जिर्ण झाले ,फाटले असल्यास ते जमा करून घेऊन दुय्यम रेशन कार्ड देण्यात येते.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित होणाऱ्या सिधावस्तू समाजातील दुर्बल घटकांना प्राधान्याने व कमी दराने मिळाव्यात याकरिता राज्यात सध्या तीन प्रकारच्या शिधापत्रिका देण्यात येत आहेत.दारिद्र रेषेखालील कुटुंबांना केशरी रंगाच्या व सधन वर्गाला शुभ्र रंगाच्या शिधापत्रिका देण्यात येतात.
शिधापत्रिका चा तपशील तक्त्यामध्ये स्पष्ट केला आहे.
| ||
अ. क्र.
|
शिधापत्रिका प्रकार
|
अहर्ता /आर्थिक मर्यादा/ निकष
|
१.
|
शुभ्र शिधापत्रिका
( एपीएल)
|
१) रुपये एक लाख पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेली कुटुंबे.
२) चार हेक्टर पेक्षा जास्त बागायती क्षेत्र किंवा चार चाकी वाहन असलेली कुटुंबे.
|
२.
|
केशरी शिधापत्रिका
( एपीएल)
|
१) रुपये १५००१ ते १ लाख वार्षिक उत्पन्न असलेली कुटुंबे.
२)चार हेक्टर पेक्षा कमी बागायती क्षेत्र किंवा चार चाकी वाहन असलेली कुटुंबे. ( टॅक्सी वगळून) .
|
३.
|
पिवळी शिधापत्रिका
(बीपीएल)
|
१) रुपये पंधरा हजार किंवा यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेली कुटुंबे.
२) १९९७ च्या दारिद्र्यरेषेखालील( बीपीएल)यादी मध्ये नाव असलेली कुटुंबे.
|
४.
|
पिवळी शिधापत्रिका (अंत्योदय) अन्नपूर्णा लाभार्थी
|
१) बीपीएल कुटुंबापैकी गरीबात गरीब कुटुंबे.
२) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील वर्गीकरणातील घटक.
३) ६५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेली व अन्य कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ मिळत नसलेली निराधार व्यक्ती.
|

No comments:
Post a Comment