👉अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मधील तरतुदी... 👈
National Food Security Act 2013
रेशन दुकान च्या ऑनलाईन तक्रार प्रणाली/ आपल्या या कार्डावरील आरसी नंबर मार्फत आपल्याला किती धान्य मिळते हे पाहण्यासाठी येथे @क्लिक करा@
- देशातील ७० टक्के ग्रामीण व ५० टक्के शहरी लोकसंख्या अन्न सुरक्षा अधिनियमान्वये लाभार्थी ठरतील.
- ग्रामीण भागात कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ४५ हजार व नागरी भागात ५९ हजार रुपये पर्यंत असेल अशी कुटुंबे प्राधान्याने लाभार्थी ठरतील.
- या योजने अंतर्गत तीन रुपये किलो तांदूळ दोन रुपये किलो गहू व एक रुपये किलो भरडधान्य अशा किमतीने प्रत्येक कुटुंबाला लाभार्थी पात्रतेनुसार धान्य मिळेल.
- सहा महिने ते १४ वर्षापर्यंत ची बालके गर्भवती स्त्रिया व स्तनदा माता यांना निर्धारित पोषण मापदंडानुसार घरी तयार करण्यासाठी वा ताजे शिजवलेले व पोषक भोजन मिळायची तर तूच कायद्यात करण्यात आलेली आहे.
- कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अन्न व नागरी पुरवठा या खात्याबरोबरीने महिला व बाल विकास (एकात्मिक बाल विकास) व शालेय शिक्षण विभाग (शालेय पोषण आहार) यांचा सहभाग राहणार आहे. हा कायदा अस्तित्वात आल्याने अंगणवाडी केंद्रामार्फत (एकात्मिक बाल विकास) योजनेत गरोदर महिलांना प्रसुती लाभ रुपये 6,000/- महिला गरोदर असल्यापासून ते मूल 6 महिन्याचे होईपर्यंत तसेच 6 महिने ते 6 वर्षे पर्यतच्या बालकांना मोफत आहार देण्यात येणार आहे.
- राज्य शासन अन्न अधिकार देण्यास अपयशी ठरल्यास नागरिक खाद्य सुरक्षा भत्ता मागण्यास पात्र राहतील सदर भत्ता किती असावयाचे मापदंड केंद्र शासन ठरवील.
- घरातील अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाच्या एका महिला सदस्याचे नाव कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणून रेशन कार्ड जारी करण्यात येईल.
- प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांची नियुक्ती केली जाईल सध्या हे काम जिल्हाधिकारी हे पाहत आहेत. ज्यांना लाभ मिळत नाही व मागणी करूनही मिळालेला नाही असेच उपेक्षित लाभार्थी जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांच्याकडे उचित मापदंडानुसार अन्न व आहार मिळावा म्हणून मागणी व तक्रार करू शकतात.
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत राज्यातील जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सदर होऊन अधिनियमाच्या कलम 15 अन्वये संबंधित जिल्ह्यातील अन्न सुरक्षा योजनेची संबंधित नसलेले अप्पर अधिकारी यांची जिल्हा तक्रार निवारण अधिकारी(district grievance redressal officer) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
- मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रातील प्राप्त तक्रारी निराकरण करण्यासाठी सदर शिधावाटप क्षेत्र ज्या महसुली जिल्ह्यामध्ये आहे त्या मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी त्यांची त्या क्षेत्राची जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
- अधिनियमाची अंमलबजावणी योग्यरीत्या पार पाडण्याच्या दृष्टीने अप्पर जिल्हाधिकारी त्यांच्या स्तरावर त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांचा समावेश करून एक स्वतंत्र कक्ष निर्माण करून त्या कक्षाद्वारे अधिनियम मध्ये अभिप्रेत असलेली तक्रार निवारण यंत्रणा उभी करून तक्रार निवारणाचे कामकाज हाताळतील. अशी शासनाने तरतूद केलेली आहे. शासन निर्णयwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक २०१७०४०७१५१६०४०४०६ असा आहे.
- गाव पातळीवर रेशन दुकानदार लोकांना व्यवस्थित रेशन देत आहे की नाही यावर देखरेख करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली रेशन दक्षता समिती गावात असते.
- तलाठी हे गावातील दक्षता समितीचे सचिव असतात. गावातील अन्य सामान्य नागरिक दक्षता समिती सभासद असतात.
- दक्षता समितीची निवड गावच्या ग्रामसभेत सर्वानुमते व्हायला हवी दक्षता समितीला घरातील सर्व रजिस्टर नोंदी तपासण्याचा व कारवाई करण्याचा अधिकार असतो.
- शहरातील रेशन दक्षता समितीचे अध्यक्ष आमदार असतात दक्षता समितीच्या सदस्यांची नावे रेषन दुकानात दिसतील अशी लावलेली असायला पाहिजेत.
- रेशन दुकानदार मापात होत असेल रॉकेल फेसाळत असेल तर वजनमाप अधिकाऱ्यांना बोलून दुकानाची तपासणी करता येते वजनमाप अधिकाऱ्यांचे कार्य प्रत्येक तालुक्यात तसेच शहरात असते.
- रेशन कार्डाच्या कामात कोणी अधिकारी लाच मागत असल्यास त्या संबंधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते. या अधिकाऱ्यांचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात तसेच शहरात असते.
- रेशन दुकानात तक्रार वही असते तिच्या प्रत्येक पानावर क्रमांक व तहसीलदार /रेशन ऑफिसर चा शिक्का असतो. ही वही लोकांना सहज दिसेल व उपलब्ध होईल अशा रीतीने दुकानात ठेवली पाहिजे. या तक्रार वहीत आपली तक्रार लिहून खाली पूर्ण पत्ता व सही करावी. लिहिता येत नसल्यास दुसऱ्याला लिहायला सांगून खाली अंगठा द्यावा.
- रेशनचे अधिकारी या तक्रारीची नोंद घेऊन तक्रारदारांना भेटून तिचे निराकरण करतात. आपणस लेखी तक्रार तहसीलदार /रेशन ऑफिसर यांच्याकडेही करता येते.
- या पातळीवर तक्रारीचे निराकरण न झाल्यास रेशन यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा. .
रेशन दुकान च्या ऑनलाईन तक्रार प्रणाली/ आपल्या या कार्डावरील आरसी नंबर मार्फत आपल्याला किती धान्य मिळते हे पाहण्यासाठी येथे @क्लिक करा@

No comments:
Post a Comment