रेशन स्वस्त धान्य संदर्भात राज्यस्तरावर विभागाच्या वेबसाईड द्वारे प्रसिद्ध करायची माहिती

रेशन स्वस्त धान्य संदर्भात राज्यस्तरावर विभागाच्या वेबसाईड द्वारे  प्रसिद्ध करायची माहिती 




अ)रेशन स्वस्त धान्य  संदर्भात राज्यस्तरावर विभागाच्या वेबसाईट द्वारे प्रकट करावयाची माहिती…

. अन्नधान्य वितरण (शक्यतो रियल टाइम वेळोवेळी अद्ययावत करावी.)
  • सर्व स्वस्त धान्य दुकानाची यादी गटनिहाय आणि जिल्हानिहाय.
  • सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांवर वितरीत करण्यात येणारे जीवनावश्यक वस्तूंचे प्रमाण व दर विषयक माहिती.
  • शिधापत्रिकांचे प्रकार.
  • नवीन शिधापत्रिका तसेच इतर सेवा मिळण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत आणि निर्गती करिता कालावधी.
  • शिधापत्रिका धारकांची यादी. (स्वस्त धान्य दुकान गावनिहाय, गटनिहाय ,जिल्हा निहाय)
  • प्रत्येक शिधापत्रिकेवर झालेले प्रत्यक्ष वितरण (एम आय एस मध्ये प्रत्येक दुकानांची माहिती भरणे आवश्यक)
  • सर्व स्वस्त धान्य दुकानांची मासिक साठा स्थिती.
  • तक्रार निवारण कार्यप्रणाली (तक्रार कोठे आणि केव्हा करायची या तपशिलासह)
  • स्वस्त धान्य दुकान/ गट /जिल्हास्तरावरील दक्षता समित्यांच्या बैठकांची इतिवृत्ते अहवाल.
  • माहिती अधिकार अधिनियम बाबत माहिती तसेच कलम ४ अंतर्गत विभागाने स्व प्रेरणेने केलेले प्रकटने.
  • स्वस्त धान्य दुकानांच्या अभिलेखांची सार्वजनिक परीक्षण करण्यासाठीच्या प्रक्रियेसंबंधी माहिती.
  • विभागातील सर्व अधिकारी यांचे नाव पदनाम व कर्तव्य.
  • नोंदविलेल्या तक्रारींची सद्यस्थिती.
  • माहिती अधिकारांतर्गत दाखल अर्जांची सद्यस्थिती.
  • सार्वजनिक लेखापरीक्षण अहवालाची सद्यस्थिती.
  • विभागाने जारी केलेले सर्व अादेश तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर परिणाम करणारे इतर संबंधित आदेश.
  • अन्नधान्य वितरण संबंधी मासीक वर्तमानपत्र (गट स्तरापर्यंतची माहिती पुरविणे बंधनकारक)

२. अन्नधान्य खरेदी (शक्यतो वेळोवेळी अद्ययावत करावी.)
  • सर्व शिधा वस्तूंची किमान आधारभूत किंमत आणि बोनस.
  • शेतकऱ्यांची नावे (गावनिहाय ,गटनिहाय ,जिल्हानिहाय)
  • प्रत्येक शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धान्याचे परिमाण आणि त्याला अदा केलेली रक्कम.
  • FAQ संबंधीची मानके.
  • MILL ची यादी.
  • प्रत्येक MILL दिलेले धान्य व MILL कडून प्राप्त झालेली धान्य.

अन्नधान्य खरेदी संबंधीची माहिती खरेदी केंद्र आणि गट स्तरावरील कार्यालय तसेच सर्व संबंधित कार्यालयांच्या ठिकाणी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.


ब) केंद्र स्तरावरील प्रकटने वेबसाईटद्वारे
  • अन्नधान्य खरेदी संबंधी अंतर्भूत असलेल्या यंत्रणांसह सर्व संबंधित तपशील.
  • अन्नधान्य वाहतुकीसंबंधी अंतर्भूत असलेल्या यंत्रणांचा सह सर्व संबंधित तपशील.
  • अन्नधान्य वितरण आणि राज्यस्तरावरील MIS शी संलग्न असलेल्या सर्व संबंधित तपशील.
  • अन्नधान्य वाहतूक हालचाली विषयी अद्यावत माहिती.
  • सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा कामकाजावर परिणाम करणारी मंत्रालय, माननीय सर्वोच्च न्यायालय इत्यादी यांनी जारी केलेले आदेश.
  • अन्नधान्य वितरण संबंधी मासिक वार्तापत्र (गट स्तरापर्यंत च्या माहितीसह)

क)इतर स्त्रोतांकडून आलेली माहिती अन्नधान्य खरेदी वाहतूक इत्यादीशी अंतर्भूत असलेल्या संस्था.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधित सर्व माहिती संबंधित संस्थेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे .तसेच सदरची माहिती मंत्रालय /अन्नधान्य विभागाच्या वेबसाइटशी लिंक करणे आवश्यक आहे .उदाहरणार्थ रेल्वे जी अन्न धान्याच्या वाहतुकीशी संबंधित आहे. त्यांनी अन्नधान्याच्या वाहतुकी संबंधी हालचालीची संबंधित अद्यावत माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

फायद्याचे कायदे जाणून घ्या

Path- Purava , Privacy Policy